संजीव मानकर
ग्रामीण प्रतिनिधी माहूर
माहूर:- तालुक्यातील गोकुळ गोंडेगांव स्थित भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका अध्यक्ष किनवट, महाराष्ट्र देवगिरी कल्याण आश्रम जिल्हा उपाध्यक्ष नांदेड, भील नाईकडा समाज नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष तथा आदिवासी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सरस्वती महाविद्यालय किनवटचे सह शिक्षक भारत नामदेवराव हातमोडे हे दि. ३१ जुलै रोजी सेवा निवृत्त झाले असून विविध पक्षांचे कार्यकर्ते त्यांना सेवापूर्तीच्या भरभरून शुभेच्छा देतांना दिसत आहेत.
किनवट/माहूर विधानसभा विद्यमान आमदार भीमराव रामजी केराम यांनी प्रत्यक्ष भारत हातमोडे यांची भेट घेऊन पुढील समाज सेवेसाठी आपण सज्ज रहावे मी तुझा मोठा भाऊ म्हणून सदैव तुझ्या पाठीशी आहे. असा शुभ संदेश दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपा युवा आघाडी अध्यक्ष व भावी जि.प.उमेदवार डॉ. निरंजन केशवे यांनी सुद्धा भेट घेऊन शुभेच्छा दिल्याने भारत हातमोडे हे राजकीय रणांगणात उतरणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत. आमदार पुत्र प्रतिक केराम व संदेश केराम यांनी सुद्धा शुभ संदेश दिला असल्याची जनमानसात चर्चा आहे.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिव व्याख्याते प्रा. हणमंतराव हंबीरे परभणी यांनी ८ जुलै रोजी गोकुळ येथे येऊन भारत हातमोडे सर व मंगलताई भारत हातमोडे (उपसरपंच) गोकुळ यांचा शाल श्रीफळ व फेटा बांधून गौरव करत सत्कार केला. या प्रसंगी छोटेखानी सत्कार समारंभात बोलतांना हंबीरे सर म्हणाले की शिक्षणाचा फार मोठा वारसा हा हातमोडे परिवाराला त्यांचे वडील नामदेवराव हातमोडे सर यांचे कडून मिळाला असून भाऊ राजेश व भावसून सुनिता हे दांपत्य सुद्धा शिक्षक आहेत. समाज सेवेची सर्वांना गोडी असून भारत हातमोडे सर जे या बाबतीत दुग्ध शर्करा योग आहेत. ते खऱ्या अर्थाने समाजाची गुरुकिल्ली आहेत. प्रा. हंबीरे सर पुढे असेही म्हणाले की गोकुळ हे गाव माझ्या साठी श्री कृष्णाच्या गोकुळा सारखं भासत आहे कारण भारत हातमोडे सारखे राजकीय समाज सेवक मला या ठिकाणी दिसत आहे. समाजाने यांच्या राजकीय कार्याचा जरुर फायदा करून घ्यावा असे भावनिक आवाहन त्यांनी केले असून भविष्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या संधीचं सोनं करून घ्यावं हा सल्ला देत हंबीरे सर यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणाला पूर्ण विराम दिला. या प्रसंगी गावातील प्रमुख नेते पुरुषोत्तम पाटील डाखोरे, संदीप पाटील राकेश, सुरेश पाटील, राजेश हातमोडे सर तथा सुनिता राजेश हातमोडे मॅडम हे उपस्थित होते. राजेश हातमोडे सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करत समारोप केला.



















