संजीव मानकर
ग्रामीण प्रतिनिधी माहूर
माहूर तालुक्यातील गोकुळ गोंडेगाव येथे पाणी पुरवठा योजनेचे विद्युत रोहित्र जळाले असल्याने दहा दिवसा पासुन पाणी पुरवठा योजनेचे कामकाज ठप्प झाले आहे. पाणी पुरवठा कर्मचारी सुधीर येवुतकर यांना विचारले असता त्यांनी रोहित्र जळाल्याचे कारण दाखवत आपले हात झटकत सरपंचाकडे बोट दाखवले.सरपंच राम लक्ष्मण सीडाम यांनी आपल्या खऱ्या जबाबदारीचे भान ठेवत कनिष्ठ अभियंता महावितरण कार्यालय वाई बाजार तालुका माहूर येथे दि ८ सप्टेंबर रोजी तात्काळ रोहित्र उपलब्ध करून देण्याची अर्जाद्वारे मागणी केली आहे. कनिष्ठ अभियंता यांनी अर्ज स्विकारुन रोहित्र देण्याचे आश्वासन दिले असले तरी अद्याप रोहित्र आले नसल्याने पाण्याची समस्या जैसे थे च आहे. पीण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करू लागले असल्याचे लक्षात येताच सरपंच राम सीडाम यांनी किनवट/माहूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव केराम यांची भेट घेतली व हिंगोलीचे माजी खासदार तथा विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांच्या सहीचे पत्र कार्यकारी अभियंता विज वितरण कंपनी भोकर यांना दिले आहे. येत्या दोन दिवसांत विद्युत रोहित्र उपलब्ध होईल व पाण्याचा प्रश्न सुटेल. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार व तो सोडवणारच असे आश्वासन राम सीडाम यांनी दिल्याने गावकरी जीव ओतून कळ सोसत असल्याचे बोलले जात आहे.
जळालेल्या विद्युत रोहित्रावर १८ शेतकऱ्यांचे कनेक्शन सुद्धा जोडलेले असल्याने अतिरिक्त भार येऊन रोहित्र जळण्याची समस्या बारबार येऊन पाणी पुरवठा योजना ठप्प होते. ही समस्या कायम स्वरूपी बंद करण्यासाठी पाणी पुरवठा योजनेचे वेगळे रोहित्र असावे तरच पाण्याचा प्रश्न सुटेल. त्यासाठी मी वाटेल ते करील पण मागे हटणार नाही असी स्पष्ट ग्वाही सरपंच राम सीडाम यांनी दिल्याने गावकरी आता बैल पोळा पाण्याविना साजरा करणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.



















